‘ती’च्या विरोधात ‘ती’, कुणाला मिळेल न्याय?

Update: 2019-03-12 13:18 GMT

गेल्या १२ फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यातून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता तो म्हणजे केळापूर-आर्णी विधानसभेचे आमदार राजू तोडसम यांच्या पहिल्या पत्नीकडून दुसऱ्या पत्नीला जबर मारहाण करण्यात आली होती... सर्व माध्यमांनी दोन बायकांमध्ये एका नवऱ्यावरुन झालेली मारहाण अशा पद्धतीने बातम्या लावल्या मात्र या मागचं खरं सत्य जाणून घेण्याचा कुणी प्रयत्न केला नाही... नेमकं काय आहे सत्य प्रकरण जाणून घेऊयात...तसेच राजू तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नी प्रिया तोडसम यांनी एक महिन्यानंतर त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यात त्यांनी धिंड काढणे, विनयभंग यांसह अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे.

अप्पर पोलीस अधीक्षकांना तक्रार वजा निवेदन सादर केल्यानंतर आमदाराच्या दुसऱ्या पत्नीने येथे पत्रकारांशी संवाद साधला. पाहा काय म्हणाल्या प्रिया तोडसम

<hFull View

3>काय घडलं त्या दिवशी?

पांढरकवडा शहरात १२ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. उपरोक्त व्यक्तींनी आपल्यावर प्राणघातक हल्ला केला, लाथाबुक्क्यांनी तसेच चप्पलींने मारहाण केली, त्याची व्हिडीओ चित्रफित बनवून सर्वत्र व्हायरल केली, गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने, मोबाईल जबरीने हिसकावून विनयभंग केला, सार्वजनिकरीत्या धिंड काढली आदी आरोप करण्यात आला आहेत. यासंबंधीची तक्रार पांढरकवडा पोलीस ठाण्यातही नोंदविण्यात आली. सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोदींच्या सभेमुळे रोखले

मारहाणीच्या उपरोक्त घटनेची फिर्याद पांढरकवडा पोलिसांत देणार होते, मात्र माझे पती आमदार राजू तोडसाम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १६ फेब्रुवारीला सभा असल्याने या सभेनंतर तक्रार देऊ असे सांगितले. त्यामुळे मी गप्प बसली. मात्र नंतर मलाच तक्रार दिल्यास अॅसट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली गेल्याचे आमदाराच्या दुसऱ्या पत्नीने सांगितले.

यवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीविरुद्ध मंगळवारी अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली. पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.

Similar News