फक्त एका जटेमुळं तिची शाळा बंद झाली !

Update: 2019-10-08 08:52 GMT

आजही जटेला लोक दैवी शक्तीचं नाव देऊन मोकळं होतात. मग देवीचा कोप होऊन आपल्यावर संकट कोसळलं. या भितीपोटी ती व्यक्तीही आपलं उभं आयुष्य देवीची सेवक म्हणुन जगत असते.

या प्रथेपायी एका 10 वर्षाच्या मुलीचंही आयुष्य जोगतीण म्हणून वेचलं जाणार होतं. मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा नंदीनी जाधव यांनी पुण्यातील विझंर गावातील साक्षी अखाडे या मुलीच्या केसात झालेल्या जटेपासून तिला मुक्त केलं आहे. नंदीनी जाधव यांनी यापुर्वीही अनेक मुलींचं जट निर्मूलन केलं आहे. पण ही कहानी जरा वेगळी आहे.

या संदर्भात नंदीनी जाधव यांनी फेसबुक वर पोस्ट लिहिली आहे.

पुणे जिल्ह्यातील ता. वेल्हा, विंझर (राजगड पायथा) गावातील साक्षी आखाडे (वय 10 वर्षे ) हिच्या केसात जट तयार झाली होती. त्या जटेमुळे केसात प्रचंड प्रमाणात उवा, लिखा, तसंच जखमा झाल्या होत्या. यामुळे शाळेतील इतर विद्यार्थिनी तिला खेळावयास घेत नव्हते. तिला एकटीला बाजुला बसवले जात होते. तिच्यामुळे इतर मुलीच्या डोक्यात उवा होत असल्याची तक्रार तिच्या शिक्षकांनी केली. त्यामुळे तिला शाळेत येऊ नको म्हणुन सांगितले.

शिक्षणाचा प्रसार वाढवण्यासाठी, गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळण्यासाठी तसंच प्रत्येक मुलं शाळेत गेलं पाहीजे. यासाठी वेल्हा तालुक्यात काम करणारी ‘प्रथम शिक्षण एज्युकेशन संस्था’ शिक्षणाचा प्रसार व गुणवत्ता वाढवण्यासाठी तसंच प्रत्येक मुलं शाळेत गेलं पाहीजे. यासाठी ही संस्था काम करते. या कार्यकर्त्याना साक्षी आखाडे शाळेत जात नसल्याची लक्षात आले. तेव्हा याबाबत माहीती घेतली असता. तिच्या डोक्यात असलेली जटेमुळे ती शाळेत जात नाही. तेव्हा त्यांनी साक्षीच्या आईवडिलांशी जटेबाबत बोलले. ही जट देवाची आहे आम्हांला काही काढायची नाही असे साक्षीच्या वडिलांनी ठणकावुन सांगितले. तेव्हा काहीही करून साक्षीला जट मुक्त करायचे ठरवले.

घावर या गावातील 11वर्षे हर्षदा रांजणे हिच्या डोक्यातही अशीच जट होती. आठ महिन्यापुर्वी तिचेही जट निर्मुलन केले होते. त्याची पेपरमध्ये आलेली बातमी या कार्यकर्त्यानी वाचली होती. त्यांनी यु ट्युबवर माझे जट निर्मुलनाचे व्हिडीओ पाहीले व मो. नंबर मिळवुन त्यांनी माझ्याशी संपर्क करून साक्षीच्या डोक्यातील जटे विषयी कल्पना दिली. गावात येवुन समुपदेशन करण्याची विनंती केली.

त्याप्रमाणे मी व मिलिंद देशमुख सर विंझर या गावी आलो. त्या गावात प्रथमचे 10/12 कार्यकर्ते आमची वाट पाहात बसले होते. प्रथम सर्व कार्यकर्त्याची ओळख करून घेतली. सर्व जण साक्षीच्या घरी गेलो. दाराला कडी होती. साक्षीची आई माधुरी आखाडे कपडे धुण्यासाठी ओढ्यावर गेल्या होत्या.

माधुरी ताईना कार्यकर्त्यानी बोलुन आणले. त्यानंतर मी त्यांच्यांशी गप्पा मारल्या. तेव्हा साक्षीच्या डोक्यातील देवाची जट आहे. याविषयी आम्ही लोणंद येथील भगत विचारले आहे. जट कापु नका, ती कापली तर तुमच्या घरावर सकंट येईल अशी भीती घातली होती. त्यामुळे ती जट कापण्यास तयार नव्हते. आजुबाजुचे लोकही भीती घालत होते. त्यांना मी जटेविषयी माहीती सांगितली. जट कशी तयार होते हे सांगितले. केस व्यवस्थित न विंचरल्यामुळे, अस्वच्छतेमुळे केसात गुंता तयार होतो. डोक्यात जखमा तसेच उवा,लिखा खुप झाल्या होत्या.त्याचे शरीरावर कसे वाईट परिणाम होतात या संदर्भात माहीती सांगितली. माधुरी ताईचं मनातील देवीविषयी असणार्या श्रध्देला धक्का न लावता, जट ही कशी अंधश्रध्दा आहे याविषयी समजावुन सांगितल्यानंतर साक्षीच्या डोक्यातील जट काढण्याची परवानगी माधुरी ताईनी दिली.

रीतसर त्यांच्याकडुन जट काढण्याची विनंती संमती अर्ज लिहुन घेतला. जट जेव्हा कापली तेव्हा वारूळातुन मुंग्या जशा बाहेर पडतात तशा उवा बाहेर पडत होत्या. केसातुन कंगवा फिरवत होते तसे उवांचा पाऊसच पडत होता.हे दृश्य खुप भयानक होते. व्हिडीओ पाहताना आपल्यांला कल्पना येईल. जट निर्मुलन करताना महा. अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख,प्रथम संस्थेचे कार्यकर्ते,विंझर गावचे माजी सरपंच,साक्षीचे आईवडिल, चुलती यांच्या उपस्थितीत जट निर्मुलन करण्यात आले.

गावातील सलुन मध्ये जट कापण्याविषयी कार्यकर्त्यानी विचारले असता तो म्हणाला "जट कापण्या आधी, मला अर्धी बाटली दारू प्यावी लागेल मगच मी साक्षीची जट कापेन असे प्रथम संस्थेचे कार्यकर्ते सांगत होते.

प्रथम संस्थेचे कार्यकर्ते यांच्या प्रयत्नातुन साक्षीला जट मुक्त करण्यात यश आले. असेच आपणही आपल्या आजुबाजुच्या परिसरात अशा कित्येक जटा असलेल्या महिला, मुली जटेसारख्या अंधश्रध्देच्या गर्तेत अडकल्या आहेत.त्यांना त्यातुन बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करूया.....

हजारो उवांनी भरलेले डोक 10 वर्षाच्या साक्षीने कसे सहन केले असेल? या विचारांनेच मन सुन्न होतंय........

भगत,गुरू यांच्याकडुन जट असलेल्या महिलांचे ,मुलीचे मानसिक,आर्थिक शोषण थांबवण्यासाठी प्रशासनातर्फे पावले उचलली जातील का?

शिक्षकांनी प्रबोधन करण्याऐवजी साक्षीला शाळेतच येवु नये हे सांगणे कितपत योग्य आहे? असे अनेक प्रश्न मनात येत आहेत

नंदिनी जाधव,

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती,

पुणे जिल्हा,कार्याध्यक्ष

7083734244

Full View

Similar News