सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जगात पुन्हा एकदा डंका

Update: 2019-05-03 10:15 GMT

आशियातील एकूण ४०० विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातून पारंपरिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १०९ स्थान मिळवलं आहे. ‘द टाइम्स हायर एज्युकेशन’चा आशियाई शिक्षण संस्थांचा अहवाल जाहीर झालं असून राज्यातील केंद्रीय संस्थांमध्ये आयआयटी मुंबई आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्च (आयसर, पुणे) या दोनच संस्थांना मानाचं स्थान मिळाले आहे. याआधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नं १८८ व्या स्थानी होता मात्र यंदा विद्यापीठाने कामगिरीत सुधारणा करत १०९ व्या स्थानी झेप घेतली आहे.

जागतिक पातळीवर शंभर शिक्षण संस्थांमध्ये चीन, जपान, हाँगकाँग, सिंगापूर, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती, मलेशिया, टर्की, तैवान आदी देशांतील शिक्षण संस्थांचा समावेश आहे. तर भारतातील क्रमशः इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स (२९), आयआयटी इंदूर (५०) आयआयटी मुंबई (५४), आयआयटी रूरकी (५४) जेएसएस अ‍ॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च (६२) आयआयटी खरगपूर (७६), आयआयटी दिल्ली (९१) या संस्थांनी स्थान प्राप्त केले आहे.

Similar News