कदाचित ‘मी' आजही त्या किराणा दुकानात काम करत असते...

Update: 2019-06-14 02:32 GMT

माझं दहावीचं वर्ष माझ्या खूप लक्षात राहण्यासारखं आणि माझ्या आयुष्याला कलाटणी देणार आहे. मी दहावीत असताना माझ्या घरगुती अडचणीनमुळे मला शाळा सोडावी लागली. त्यानंतर मी एका किराणा दुकानात काम करू लागले. पण शिकण्याची इच्छा कायम होती. मी अनेक ठिकाणी चौकशी केली सुशिक्षित लोकांना विचारलं आणि मला समजलं की मी शाळेत न जाता ही 10 वीची परीक्षा देऊ शकते. मग मी 17 नंबर चा फॉर्म भरून 10 वी ची परीक्षा दिली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मी पहिल्याच प्रयत्नात पासही झाले, मार्क कमी पडले होते पण पुढचे शिक्षण करण्यासाठी पुरेसे होते.

नंतर 11 वीला आर्ट शाखेत ऍडमिशन घेऊन ग्रॅज्युएट होऊन मास कम्युनिकेशन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झाले. आणि आयुष्य बदलले जर मी 17 नंबरचा फॉर्म भरून 10 ची परीक्षा दिली नसती तर कदाचित मी आजही त्याच किराणा दुकानात काम करत असते. मार्क जास्त मॅटर करत नाहीत. जिथे आहोत तिथून पुढे जात नवनवीन कटू-गोड अनुभव घेत जगणं मला महत्वाचं वाटतं. शेवटी जीवन अनमोल आणि सर्वार्थानं सुंदर आहे

सरिता बागडे

#माझंदहावीचंवर्ष #MaxWoman

Similar News