शिवाजी विद्यापीठातील महिलांच्या लैंगिक छळाबाबतचा अहवाल दडपला - डॉ. मेधा नानिवडेकर

Update: 2020-03-06 13:48 GMT

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठामध्ये जाणिवपूर्वक लैगिक अत्याचाराची प्रकरणं दडपून लैंगिक अत्याचार प्रकरणातील अहवाल लपवत असल्याचा गंभीर आरोप शिवाजी विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉक्टर मेधा नानिवडेकर यांनी केला आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मेधा नानिवडेकर यांनी शिवाजी विद्यापीठावर गंभीर आरोप केलेत. 2012 सालापासून ते 2016 पर्यंत शिवाजी विद्यापिठात जी लैंगिक अत्याचाराची प्रकरणं घडली. त्याची न्यायमूर्ती जे एन शानबाग यांच्या तथ्य शोधन समिती मार्फत चौकशी झाली आहे. त्याचा अहवाल शिवाजी विद्यापीठाला प्राप्त होवून देखील हा अहवाल विद्यापीठ का उघड करत नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.\

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/251513229175798/?t=1

 

Similar News