बॉलीवूड : करोनामुळे आम्हा दोघांना मिळाला एकत्र वेळ - रणवीर सिंग

Update: 2020-03-24 10:36 GMT

Covid-19 ने जगभर थैमान घातलं आहे. या ग्लोबल संकटाचा आपल्या सगळ्यांना धीराने सामना करावा लागणार आहे. असं सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग याने मॅक्सवुमनशी बोलताना सांगितलं.

Energetic रणवीर पुढे म्हणाला, मी कपिलदेवची भूमिका (बायोपिक ) करत असलेला '८३ ' हा सिनेमा शूटिंग होऊन संपला. डबिंग -प्रमोशन बाकी होते. परंतु सगळ्याच फिल्मच्या रिलीज डेट्स आता बेमुद्दत पुढे गेल्या आहेत, त्यामुळे काहीही नक्की नाहीये.

मला आणि दीपिकाला एकत्र वेळ घालवण्याची ही संधी आहे असं म्हणेन मी. अर्थात ह्या ग्लोबल इशूजचा सगळ्यांनी धीराने सामना करणं इतकंच आपल्या हातात आहे !

Similar News