मुलींना मिळणार मोफत शिक्षण.....

Update: 2019-06-04 06:26 GMT

मुलगी शिकली प्रगती झाली… अशी म्हणं आता सत्यात बदलेलं असा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे.

सोमवारी पंजाब विधानसभेत कॅप्टन अमरिंदर सिंह सरकारने पहिलेच बजेट सादर केले असून यात मुलींना नर्सरी ते पीएचडीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुलींचे नर्सरी ते पीएचडीपर्यंतच शिक्षण मोफत होणार आहे. तसेच सरकारी शाळांमध्ये पाठ्यपुस्तकही मोफत देणार असून शाळा व महाविद्यालयांमध्ये वायफायची सुविधा करणार आहेत. २०११च्या जनगणनेनुसार पंजाबच्या साक्षरतेचा टक्का ७५.८४% होता. येथील ८०.४४% पुरुष तर ७०.७३% महिला साक्षर आहेत. तर एकूण संख्या १,८७,०७,१३७ एवढी आहे.

Similar News