म्हणून प्रियंकाने बांधलं हाती शिवबंधन

Update: 2019-04-19 13:26 GMT

एखादी महिला सर्व काही सहन करु शकते मात्र तिच्या चारित्र्यावर किंवा तिच्या सोबत झालेल्या गैरवर्तवणूनकीवर मूक गिळून बसण्यातली आजची महिला नाही. मग ती सामान्य महिला असो किंवा राजकारणात सक्रीय असणारी महिला असो... आजच याच उत्तम उदाहरण पाहायला मिळालं ते म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील माजी प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेधी यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचं शिवबंधन आपल्या मनगटात बांधून घेतलं. ऐन लोकसभा निवडणुकांवेळी प्रियंकाचा प्रवेश हा शिवसेनेत झाला असून याचा मोठा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. त्यांनी आज मातोश्रीवर येऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. महिला आणि युवकांसाठी देशभरात काम करण्याची इच्छा व्यक्त करत शिवसेनेला राष्ट्रीय पातळीवर मजबूत करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.

का सोडला काँग्रेसचा हात?

मी अत्यंत विचारपूर्वक माझा निर्णय घेतला असून गेली 10 वर्षे नि:स्वार्थपणे काँग्रसेमध्ये सेवा केली. पक्षासाठी मी टीकेचा सामना केला, दगड झेलले मात्र पक्षाच्या नेत्यांनीच मला धमक्या दिल्या. काँग्रेसमध्ये मला गैरवर्तवणुकीचा सामना करावा लागला. काँग्रेसकडून मला लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ते भेटले नाही म्हणून मी पक्ष सोडलेला नाही, असा खुलासाही यावेळी प्रियंका चतुर्वेदींनी केला. काही दिवसांपूर्वी प्रियंका चतुर्वेदी यांनी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिलं जात असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल त्यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी काँग्रेसच्या ट्विटर हँडललादेखील टॅग केलं होतं. यामुळे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना काँग्रेसमधील नाराजी समोर आली होती.

 

Similar News