ममता बँनर्जीची विधानसभेची तयार सुरु

Update: 2019-06-01 09:30 GMT

तृणमूल काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये काही जागा गमवाव्या लागल्या आहेत. भाजपाला काटे कि टक्कर देत आपलं वर्चस्व कायम ठेवलं. मात्र भाजपला मोठ्या प्रमाणात मिळालेल्या अभूतपूर्व यशाने तृणमूल काँग्रेसच्या अडचणीत वाढ झालीय. सध्या बंगालमध्ये ममता बँनर्जी यांचं सरकार आहे.

विधानसभा निवडणुकीत पाय उतार होऊ नये यासाठी ममता यांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरु केलीय. त्यासाठी त्यांनी एक गुप्त बैठक स्वतःच्या निवासस्थानी बोलावली होती. आरएसएसला बंगालमध्ये वाढण्यापासून रोखण्यासाठी जय हिंद वाहिनी आणि बंग जननी वाहिनी या दोन नव्या पथकांची स्थापना करण्यात आली त्यामध्ये जय हिंद वाहिनीच्या अध्यक्षपदी आणि संयोजक पदावर ममतांनी आपले बंधू कार्तिक बँनर्जी यांची तर बंग जननी वाहिनीचे अध्यक्षपद खासदार काकोली घोष दस्तीदार याच्याकडे देण्यात आले आहे.

Similar News