नागपुरात झोपलेलं सरकारी रुग्णालय, गर्भवती महिलेला करावी लागली स्वतःची प्रसूती
नागपुरात शासकीय रुग्णालय असूनही गर्भवती महिलेस स्वतःची प्रसूती करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुकेशनी चतारे या महिलेचं नाव असून ती गर्भवती असल्यापासून तिचा उपचार येथील सरकारी रुग्णालयात सुरु होता. १ जून ला तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं. भरती केल्यानंतर या महिलेला चक्क जमिनीवर झोपवण्यात आलं. २ जून ला पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरु झाल्यानंतर तिला असह्य वेदना होत असतांना तिचा आवाज ऐकून दुसऱ्या रुग्णाची नातेवाईक महिला तिच्या मदतीला धावून आली. परंतु रुग्णालयात झोपलेल्या परिचारिकांना आणि डॉक्टरांना जाग आली नाही. गर्भवती महिलेनं दुसऱ्या महिलेची मदत घेऊन स्वतःची प्रसुती केली. या प्रकारमुळे नागपुरातील हे सरकारी रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे.