PositiveNews: महाराष्ट्रात 'या' 4 जिल्ह्यांनी जिंकली कोरोना ची लढाई...

Update: 2020-04-22 04:12 GMT

एकीकडे राज्यात कोरोना ची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून एकही रुग्ण आढळलेला नाही. केंद्र सरकार च्या आरोग्य विभागाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील या 4 जिल्ह्यामध्ये सुरुवातीला कोरोना चे नवे रुग्ण आढळले होते. मात्र, त्यानंतर एकाही नवीन रुग्णाची नोंद या जिल्ह्यात झालेली नाही. त्यामुळं या जिल्ह्यातील नागरिकांसह प्रशासनाचं कौतुक केलं जात आहे.

या जिल्ह्यामध्ये वाशी, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळं या 4 जिल्ह्यांनी आत्तापर्यंत कोरोनाची लढाई जिंकली आहे. मात्र, भविष्यात ही इथल्या नागरिकांना आणि प्रशासनाला काळजी घेणं गरजेचं आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाबाधीत ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५२१८ झाली आहे. १५० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४२४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Similar News