अमूल्य बर्थडे गिफ्ट; पूजा मुळे परराष्ट्र सेवेत दाखल

Update: 2019-04-06 10:52 GMT

वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट हे मिळतचं मात्र देशाची सेवा करण्याची संधी म्हणून गिफ्ट मिळणारी पूजा एकमेव मुलगी असेल जिने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ११ वा क्रमांक मिळवून तिची भारतीय परराष्ट्र सेवेसाठी (आयएफएस)तिची निवड झाली आहे. पूजा ही निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या आहे. परराष्ट्र सचिव पदावरून ज्ञानेश्वर मुळे निवृत्त झाल्यावर अवघ्या तीनच महिन्यांत पूजाची निवड झाली असल्यामुळे मुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. वडिलां राजदूत म्हणून काम करताना पाहूनच पूजाने परराष्ट्र सेवेत जाण्याचा निर्धार केला होता.. दिल्लीत पदवीपर्यंतच शिक्षण घेतल्यानंतर कोलंबिया विद्यापीठातून समाज व्यवस्थापन या विषयात तिने पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. पूजाने तिसऱ्या प्रयत्नात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादित केलं आहे. योगायोगाने पूजाच्या वाढदिवसाच्या दिवशीच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. वाढदिवसाच्या दिवशीच परीक्षेत उत्तीर्ण होणं ही एक अमूल्य भेट असल्याची भावना पूजाने व्यक्त केली आहे.

Similar News