International Day of Yoga: योगा केल्यानं खूप ऊर्जा मिळते- शिल्पा शेट्टी
आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त देशभरात विविध कानाकोपऱ्यात सुमारे १३ कोटी लोक योगासनं करणार आहेत. आज भारतासह संपूर्ण जगात ५ वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येत आहे. दरम्यान यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या योगासन शिबीरात हजेरी लावली आहे. दिवसातून १० मिनिटांचा वेळ काढून प्राणायमही आवर्जून करा असेही शिल्पा शेट्टीने सांगितले. त्याचबरोबर योगा केल्याने ऊर्जा मिळते, शरीर निरोगी राहात आणि आज जे मी फिट तुमच्यासमोर उभी आहे ती फक्त योगामुळे असंही शिल्पा शेट्टीने सांगितलं.
https://twitter.com/ANI/status/1141888367765778432
https://twitter.com/TheShilpaShetty/status/1141596070213849089