पराभूत नेत्यांच्या बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर

Update: 2019-11-17 09:45 GMT

भाजपने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीत परळी मतदासंघाच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत अनेक चर्चा रंगत आहेत.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. बड्या नेत्यांच्या पराभवाचे कारण समजून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. पराभूत नेत्यांचा योग्य तो सन्मान करून त्यांना पक्षाची जबाबदारी दिली जाणार असल्याचं प्रसार माध्यामांशी बोलताना चंद्रकात पाटील यांनी म्हटलंय.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. अखेर या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी बाजी मारली. निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी झालेल्या हालचालींमध्येही पंकजा फारशा कुठे दिसल्या नाहीत. शिवाय आता भाजपच्या पराभूत नेत्यांच्या बैठकीला देखील गैरहजर असल्याने त्यांची तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Similar News