29 मार्चला इतिहास घडणार, महिला अंतराळवीर स्पेसवॉक करणार

Update: 2019-03-27 12:26 GMT

इतिहासात पहिल्यांदाच येत्या 29 मार्चला नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने आपल्या दोन महिला अंतराळवीरांना ‘स्पेसवॉक’ (अंतराळात यानाशिवाय भ्रमण करणे) आयोजित करण्याचे ठरविले आहे. हा स्पेसवॉक सुमारे सात तास चालणार आहे.

या मोहिमेदरम्यान अॅनी मॅक्लेन आणि क्रिस्टीना कोच या अंतराळात भ्रमण करणार आहेत. ही मोहीम कॅनेडियन स्पेस एजन्सी (CSA) याच्या फ्लाइट कंट्रोलर क्रिस्टन फॅसिओल यांच्या अधिपत्याखाली कार्यरत केली जाणार आहे. या मोहिमेत निक हेग देखील सामील होतील. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) येथे आधीपासूनच नियोजित असलेल्या तीन स्पेसवॉकच्या श्रृखंलेतील ही दुसरी मोहीम आहे.

 

Similar News