देशातील हल्ल्यांबाबत भुमिका घेणे गरजेची-अरुणा ढेरे

Update: 2020-01-11 11:55 GMT

साहित्य संमेलनच्या माजी अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी ९३ व्या साहित्य संमेलनात आपलं परखड मत व्यक्त केलं. ‘कोणताही आक्रमक हल्ला निंदनीयच असतो. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन त्याला विरोध केला पाहिजे. आपण भारतीय एक जागरूक नागरिक आहोत त्यामुळे अशा हिटलरशाहीच्या मागे का जाऊया? असं म्हणत त्यांनी साहित्यिकांवर कोणताही दबाव नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सर्वच सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांचं जे विश्वास संपादन केलेलं असतं त्याला तडा जाणार नाही अशी वर्तवणूक राजकीय लोकांनी करू नये . मात्र आताची परिस्थिती सध्या टोकाला गेलेली आहे. त्यामुळे आता तरी किमान सत्ताधाऱ्यांनी याचा विचार करायला हवा. या सर्व वातावरणात साहित्यिक, विचारवंतांनी यासंदर्भात भूमिका घेऊन पुढे आले पाहिजे. असं मत माजी अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी व्यक्त केलं आहे.

Similar News