निता अंबानी आहेत विदेशातील ‘या’ भव्य संग्रहालयाच्या ट्रस्टी

Update: 2019-11-13 11:56 GMT

रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष निता अंबानी यांना न्युयॉर्कमधील ‘मेट्रोपॉलिटन म्युझिअम ऑफ आर्ट’च्या बोर्ड मध्ये स्थान देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निता अंबानी या संग्रालयात होणाऱ्या प्रदर्शनांना आधार देत आहेत.

मेट्रोपॉलिटन संग्रहालय हे 149 वर्ष जुने आहे. येथे जगभरातील 5000 वर्ष जुन्या कलाकृती आहेत. दरवर्षी लाखो लोक या संग्रहालयात भेट देतात. रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून निता अंबानी या जगभरात भारतीय कला व संस्कृतीचा प्रचार करत आहेत. तसेच देशातील क्रीडा व विकास योजनांना देखील प्रोत्साहन देत आहेत.

निता अंबानी यांच्या मदतीने कलेचा अभ्यास आणि प्रदर्शन करण्यासाठी संग्रहालयाच्या क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्याचं संग्रहालयाचे अध्यक्ष डॅनियल ब्रॉडस्कीन यांनी सांगितले आहे.

Similar News