निर्भया बलात्कार प्रकरण: दोषींची फाशी तिसऱ्यांदा टळली

Update: 2020-03-02 13:30 GMT

दिल्लीच्या पटीयाला हाऊस कोर्टाने निर्भया बलात्कार प्रकरणातील (Nirbhaya Rape Case) चारही दोषींच्या फाशीवर स्थगिती आणली आहे. या चौघांनीही उद्या म्हणजेच ३ मार्च रोजी सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार होती. दोषींच्या फाशीवर स्थगिती येण्याची ही तीसरी वेळ आहे. पवन गुप्ता, मुकेश सिंह, विनय कुमार शर्मा आणि अक्षय कुमार अशी दोषींची नाव असून यांच्यापैकी पवनची दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. यामुळे तुर्तास फाशीची शिक्षाही स्थगित झाली आहे.

फाशीची तारीख येताच दोषींपैकी कोणीतरी आपली दया याचिका किंवा पुवर्विचार याचिका दाखल करुन फाशीची तारीख पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. सुप्रीम कोर्टातून दोषीवर फाशीची मोहोर लागल्यानंतर त्या दोषीला फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी दोन पर्याय असतात. दया याचिका- जी राष्ट्रपतींकडे पाठवली जाते आणि पुनर्विचार याचिका- जी सुप्रीम कोर्टात केली जाते. या दोन्ही याचिका फेटाळल्य़ानंतर सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली जाते. येथे ठरलेल्या शिक्षेवर फेरविचार करण्याची विनंती करतात. यानंतर फाशीच्या शिक्षेएवजी जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

Similar News