Nirbhaya: अखेर दोषींचे सर्व मार्ग संपले... उद्या होणार फाशी

Update: 2020-03-19 09:22 GMT

निर्भया बलात्कार प्रकरणात (Nirbhaya Rape Case) दोषी पवन गुप्ता याला सुप्रीम कोर्टाकडून गुरुवारी झटका बसला आहे. फाशीच्या एक दिवस आधी सुप्रीम कोर्टाने पवनची क्युरेटीव्ह याचिका फेटाळून लावली आहे. त्याने गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्याचं कारण पुढे करत सुप्रीम कोर्टात सुधारात्मक याचिका दाखल केली होती.

यापुर्वी पवनने गुन्हाच्या वेळी तो अल्पवयीन असल्याचा युक्तीवाद सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावण्याच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.

तर अक्षय सिंह याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्याकडे दुसऱ्यांदा दयेचा अर्ज दाखल केला होता. मात्र राष्ट्रपतींनी तो स्विकारण्यास नकार दिला आहे. यामुळे दोषींना उद्या फाशी होणार हे जवळपास निश्चित होताना दिसते आहे.

निर्भयाच्या दोषींना फाशीसाठी आता काही तासच शिल्ल्क असताना दोषींच्या वकिलाकडून सर्वच शक्य ते प्रयत्न केले जात आहेत. तिहार जेल प्रशासनानेही फाशीची पुर्वतयारी केली असून पवन, विनय आणि मुकेश यांच्या कुटुंबियांनी त्यांची भेट घेतली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून दोषींचे वकिल अनेक युक्त्या लावून पुन्हा फाशी पुढे ढकलण्यासाठी केलेल प्रयत्न...

  • १७ मार्च – आरोपींनी घेतली आंतरराष्ट्रीय कोर्टात (ICJ) धाव.

अक्षय सिंग, पवन गुप्ता आणि विनय शर्मा यांनी फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी ‘गुन्ह्याची सदोष तपासणी’च कारण देत आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली.

  • १८ मार्च – अक्षय सिंगने राष्ट्रपतींकडे तर, पवन गुप्ताने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली

अक्षय ठाकूर याने दुसऱ्यांदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका सादर केली. पवन गुप्ता याने सुप्रीम कोर्टात सुधारात्मक याचिका दाखल केली.

  • १८ मार्च – निर्भयाच्या एका दोषीच्या पत्नीने केली घटस्फोटाची मागणी

अक्षय ठाकुर याची पत्नी पुनिता ठाकूर हिने कौटुबिक न्यायालयात घटस्फोटाची मागणी केली. पुनिताने आपल्या पतीला निर्दोष असल्याचं म्हणत त्याच्या फाशीनंतर मला विधवा म्हणून जगायचं नसल्याचं म्हटलं होत.

  • १९ मार्च – सुप्रीम कोर्टाने दोषींच्या वकिलाला फटकारले

फाशीच्या दिवसाच्या अतिंम दिवशी कायदेशीर डावपेच वापरुन वेळकाडूपणा केल्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी दोषींचे वकील ए.पी.सिंग यांना चांगलेच फटकारले.

  • १९ मार्च – दोषी मुकेश सिंह याची सुप्रीम कोर्टात पुन्हा याचिका

दोषी मुकेश सिंह याने सुप्रीम कोर्टात पुन्हा याचिका दाखल करत गुन्ह्याच्या वेळी तो दिल्लीत नसून राजस्थान मध्ये असल्याचा दावा केला आहे. आपल्यासोबत निष्पक्ष न्याय न झाल्याचं त्याने या याचिकेत म्हटलंय.

 

Similar News