निर्भया प्रकरण : आज सुप्रीम कोर्टात शेवटची सुनावणी

Update: 2020-01-28 07:18 GMT

निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश कुमार सिंग याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मुकेशने याआधि दया याचिकेचे निवेदन केलं होतं. अखेर ही दया याचिका फेटाळली गेली यावर मुकेशने आव्हान दिलं आहे. या याचिकेवर सुनावणी करण्याची मागणी चीफ जस्टिस एस.ए बोबडे यांनी केली असून यांच्या अध्यक्षतेतील तीन सदस्यीय खंडपीठ आहेत. दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 17 जानेवारी रोजी मुकेशची दया याचिका फेटाळाली होती.मात्र मुकेशने फाशीची शिक्षा आजीवान कारावासात करावी, अशी मागणी राष्ट्रपतीकडे केली होती. मुकेश आणि अक्षयने याआधि पुनर्विचार याचिका दाखल केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली. पवन गुप्ता आणि विनय शर्मा यांनी अद्याप पुनर्विचार याचिका दाखल केली नाही.

Similar News