मनोहर जोशींचं वक्तव्य हे वैयक्तिक , शिवसेनेची भूमिका नाही : नीलम गोऱ्हे

Update: 2019-12-11 07:17 GMT

राज्यातील महाविकास आघाडीमुळे राज्यातील समीकरणे बदलली आहेत. २५ ते ३० वर्षाची भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यामुळे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसजवळ हातमिळवणी केली. या सर्व प्रकरणानंतर शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

भाजप आणि शिवसेना एकत्र यायला हवं असं मला वाटतं त्याचबरोबर शिवसेना आणि भाजप कधीही एकत्र येतील याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील

असं विधान मनोहर जोशी यांनी केलं आहे. यावर शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी

मनोहर जोशीचं वक्तव्य हे त्यांचे वैयक्तीक असल्याचं त्यांनी सांगितले. याबाबत शिवसेनेची कोणतीच भूमिका नसल्याची

त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विकासासाठी ही आघाडी एकत्र आलेली असल्याचं त्यांनी सांगितले.

Similar News