पुण्यातील अनोखा नवरात्र उत्सव

Update: 2019-09-29 15:46 GMT

देशभरात नवरात्रोत्सवास सुरूवात झाली. ठिकठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलीय. एकविसाव्या शतकात सर्वांना राष्ट्रमातांविषयी तसेच त्यांच्या इतिहासाबाबत माहिती व्हावी म्हणून पुण्यात एक अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय. नवरात्रीमध्ये जसा देवीचा उत्सव साजरा केला जातो तसाच नवराष्ट्रमातांचा उत्सव साजरा केला जाणारंय.

पुण्यातील देहूरोड येथील धम्मभूमी येथे अनोख्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतोय. सगळीकडे नऊरात्रीत देवीची पूजा केली जाते परंतु या मंडळाने ९ राष्ट्रमातांचं पूजन करण्याच ठरवलं आहे. ज्यांनी राष्ट्र घडवले, ज्यांनी लढायला शिकवले असा महिलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न असल्याचं टेक्सास गायकवाड यांनी सांगितलं. या उत्सवाचं उद्घाटन तृप्ती देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

देहूरोड येथे असा अनोखा नवरात्रउत्सव साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. महामाया, राष्ट्रमाता जिजाऊ, संघमित्रा, एकवीरा, झलकारी, सावित्रीमाई, रमाई, आहिल्यादेवी या राष्ट्रमातांची ९ दिवसांसाठी स्थापना करून पूजा करण्यात येणार आहे.

Similar News