स्त्रियांच्या कर्करोगावर अनोखा उपक्रम, “आरसा पाहा आजार ओळखा”

Update: 2020-02-04 03:51 GMT

नायर हॉस्पिटलमध्ये स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनोखा उपक्रम राबवला जात आहे. “आरसा पाहा आजार ओळखा” या उपक्रमांतर्गत स्त्रियांच्या छातीतील गाठ(Breast Cancer) ओळखण्यासाठी नायर हास्पिटल मध्ये प्रक्षिशण दिले जात आहे. स्तनांचा कर्करोग हा वेळेवर बरा होऊ शकतो. पण त्याचं वेळेवर निदान व्हायला पाहिजे असं नायर हॉस्पिटलमधील डाक्टरांचं मत आहे.

ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये स्तनाची गाठ आढळली तर त्या डॉक्टरकडे जाण्यासाठी संकोच करतात. तीच परिस्थिती शहरी भागातील स्त्रियांमध्येही आढळते. त्यामुळे हा अनोखा उपक्रम राबवून स्त्रीयांना आता स्वतःच्या स्तनातील गाठ ओळखता यावी याकरिता हा उपक्रम राबवण्याचा उद्देश आहे.

अलीकडच्या काळात स्त्रियांच्या छातीत गाठ होऊन कॅन्सर सारख्या आजारांना समोर जावं लागत. नक्की कशाप्रकारे हा उपक्रम नायर हॉस्पिटल मध्ये राबवला जातोय? कशी स्तनांची काळजी घेतली पाहिजे यासंदर्भात नायर हॉस्पिटलचे डॉक्टर माहिती देत आहेत. पाहा व्हिडिओ..

Full View

Similar News