हिवाळी अधिवेशनादरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या आमदार निवासात अजूनही असुरक्षित दिसून येत आहे. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी १६ डिसेंबर ला मुद्दा मांडला होता. मात्र कोणतीही अंमलबजावणी न झाल्यामुळे हा मुद्दा त्यांनी आज पुन्हा विधानसभेत मांडला. याची दखल विधानसभा अद्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला तत्काळ काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे पुन्हा एकदा महिला आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे.
https://youtu.be/K6f_Q0wB7x8