केरळात 150 मुस्लिम संस्था मध्ये बुरखा बंदी

Update: 2019-05-03 05:32 GMT

केरळमधील एमईएसच्या अंतर्गत शिक्षण संस्थेकडून आपल्या शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थीनींसह कर्मचाऱ्यांना बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यातील कालिकत येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीने यासंबंधीचे पत्रक जारी करून सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात बुरखा परिधान करण्यास बंदी घातली आहे. या पत्रकानुसार महिलांनी चेहरा झाकला जाईल असं कोणताही वेश परिधान करु नये. या निर्णयाचा केरळमधून निषेध केला जात आहे. हे मुस्लिम धर्माच्या विरुद्ध असून यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. दरम्यान, एमईएसने असं म्हणणं आहे की, त्यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी विविध संघटनांशी चर्चा केली असून त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.

Similar News