‘या’ राज्यात महिलांचं पुरुषांपेक्षा जास्त मतदान

Update: 2019-05-21 07:19 GMT

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा झाल्यानंतर मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. या निवडणुकीत महत्व्याची बाब आणि आनंदाची बातमी म्हणजे १३ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांनी जास्त मतदान केलं आहे. त्यांची एकूण पुरुषांपेक्षा मतदान टक्केवारी जास्त आहे. यामध्ये उत्तर भारतातील दोन राज्ये बिहार आणि उत्तराखंडनेही स्थान मिळवलं आहे. विशेष बाब म्हणजे केरळ, तामिळनाडूत गेल्यावर्षीपेक्षा महिलांनी जास्त मतदान केलं आहे. दरम्यान #लोकसभा निवडणूक २०१९ एकूण पुरुषांच्या तुलनेत २१ लाख अधिक महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

या राज्यांचा समावेश ?

केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, मणिपूर, मेघालय, पाँडिचेरी, गोवा, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, मिझोराम, दमन दीव, लक्षद्वीप

Similar News