भाजपला ‘बिनकामाचे उद्योग खाते’ द्यावे- रोहित पवार

Update: 2020-02-27 06:11 GMT

शेतकरी आणि महिला सुरक्षा या प्रश्नांवर सभागृहात चर्चा व्हावी म्हणुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपने सभागृहाबाहेर जोरदार निदर्शन करत कामकाज बंद पाडण्यात यश मिळवलं आहे. मात्र, सभागृहात महिलांच्या प्रश्नांवरून लक्षवेधी मांडण्यात आली तेव्हा इतर मुद्यांवरून गोंधळ घालून आपले खरे रंग भाजप दाखवत आहे अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. भाजपला बिनकामाचे उद्योग खाते जाहीर करुन त्या खात्याचं प्रतिनिधीत्व करु द्यावे असा टोलाही त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून लगावला आहे.

“पहिल्या दिवशी ही मंडळी सभागृहाबाहेर महिला प्रश्नांवरुन आवाज उठवतात पण सभागृहात जेव्हा महिलांच्या प्रश्नावरून लक्षवेधी मांडण्यात येते तेव्हा इतर मुद्यांवरून गोंधळ घालून आपले खरे रंग दाखवतात” असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. ‘विरोधासाठी विरोध करण्याहून सभागृहात शांततेत चर्चा करून प्रश्न सोडवणं अधिक गरजेच आहे.’ असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

रोहित पवार यांनी भाजपला वर्गातल्या हुशार मुलांची पुस्तक लपवणाऱ्या खोडकर मुलाची उपमा दिली आहे. “वर्गात एखादा असा मुलगा असतो जो स्वत: अभ्यास करत नाही पण हूशार मुलांची पुस्तके दडवून त्याला कसे कमी मार्क पडतील याचा आटोकाट प्रयत्न करतो. विरोधी पक्षाचे लोक सध्या हे एकमेव काम अगदी प्रामाणिकपणे करतात.” असं मत रोहित पवार यांनी मांडलय.

Full View

Similar News