‘मला आता माझ्या भारत 'परिवाराची' चिंता वाटतेय’ : यशोमती ठाकूर

Update: 2020-09-07 17:18 GMT

जून नंतरच्या तिन महिन्यात देशाच्या विकासदरात सर्वाधीक घट झाल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) च्या प्रमुख अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगीतले. गीता यांनी एक आलेख ट्वीट केला आसून ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर टॉप 20 अर्थव्यवस्थांमधे भारची स्थिती शेवटच्या क्रमांकावर असल्याचं दिसून येतं.

अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांच्या ट्वीट ला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी रिट्वीट केलं असून यात त्यांनी “भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत . मला आता माझ्या भारत 'परिवाराची' चिंता वाटतेय...” असं म्हटलं आहे.

या ट्वीटच्या माध्यमातून ठाकूर यांनी देशाच्या ठासळत्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Similar News