मायावतींकडून निवडणूक आयोगालाच सल्ला

Update: 2019-05-14 08:19 GMT

निवडणूकीसाठी राजकीय नेते प्रचारासाठी अनेक रोड शो, प्रचार सभा आणि रॅली वर भर देताना दिसतात.

तसेच उमेदवार मंदिरात जाऊन पूजा करतात, सार्वजनिक ठिकाणी जाऊन प्रचार करतात. त्यामुळे उमेदवाराच्या निवडणूक खर्चात या सर्वाचा समावेश असणे आवश्यक आहे अशी मागणी मायावतींनी केली आहे.

आचार संहितेचे उल्लंघन केल्यावर उमेदवारांवर प्रचाराची बंदी घातली जाते त्यामुळे उमेदवार मंदिरात प्रार्थना करताना किंवा सार्वजनिक ठिकाणी जाताना दिसतात. या गोष्टी मीडिया दाखवत देखील असेल पण यावर बंदी घालायला पाहिजे. निवडणूक आयोगाकडून यावर योग्य ती कारवाई करावी असा सल्ला बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे

Similar News