अलिकडे सोशल मीडियावर एक ट्रोल संस्कृती उदयास आली आहे. त्याच्यासाठी पेड ट्रोलरचा देखील वापर केला जातो. राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातील लोकांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. बऱ्याचदा या ट्रोलरला मोठ मोठे नेते देखील फॉलो करत असल्याचं समोर आलं आहे. विशेष बाब म्हणजे ज्या व्यक्तीला हे ट्रोल करत आहे. तो व्यक्ती त्या ट्रोलरला त्याच भाषेत उत्तर देऊ शकत नाही. मात्र, मराठ मोळी अभिनेत्री केतकी चितळे हिला ट्रोल करण्यात आल्यानंतर तिने या ट्रोल्सचा ट्रोर्ल्सच्या भाषेतच उत्तर दिले आहे. तिने मी देश का सोडू मला लाज वाटत नाही, असे देखील व्हिडिओत म्हटलं आहे . मराठी अस्मिता व मराठी भाषेचा इतका अभिमान वाटत असेल तर लॅटीन किंवा इंग्रजी शब्दांत का लिहिले? असा जाब तिने विचारले आहे.
Full View
मध्यंतरी केतकीने आपल्याला फॉलो करणारे मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजी भाषेतील असल्यामुळे आपण यापुढे हिंदीत व्हिडीओ करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर तिला सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत मोठ्या तुला मराठीची लाज वाटत असल्याची टीका करून तिला ट्रोल केले आहे.