लोकसभेच्या सभापतीपदी मनेका गांधी? 

Update: 2019-06-04 09:15 GMT

लोकसभेचे अधिवेशन १७ जूनपासून सुरु होतेय.मात्र अजून लोकसभेच्या सभापतींची निवड करण्यात आलेली नाही. लोकसभेच्या सभापतीपदी कुणाची निवड होणार याविषयी मोठी उत्सुकता आहे. सभापतीपदासाठी मनेका गांधी, राधामोहन सिंह आणि विरेंदर कुमार या माजी केंद्रीय मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत.

एनडीए हा सर्वांत मोठा पक्ष असल्याने लोकसभेचे सभापतीपद भाजपला मिळणार आहे. सर्वात आघाडीवर मनेका गांधींचं नाव चर्चेत आहे. त्या सर्वांधिक आठवेळा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. सर्वांत ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांची हंगामी सभापतीपदी निवड होणे निश्‍चित मानले जात आहे. त्या पदासाठी मनेका या स्वाभाविक पर्याय मानल्या जात आहेत.

राधामोहन आणि विरेंदरकुमार हे दोघेही सहाव्यांदा खासदार बनले आहेत. त्यामुळे सभापतीपदासाठीचे तेही प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्याशिवाय, जुअल ओराम आणि एस.एस.अहलुवालिया हे माजी केंद्रीय मंत्रीही शर्यतीत आहेत. यावेळी उपसभापतीपद बिजू जनता दलाला (बिजद) मिळण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास त्या पक्षाचे ज्येष्ठ खासदार भतृहरी माहताब यांची वर्णी लागू शकते. मागील वेळी अण्णाद्रमुकचे एम.थंबीदुराई यांनी उपसभापतीपदाची जबाबदारी सांभाळली.

Similar News