महिला आयोगाला हवेत सक्षमीकरणावरील लघुपट......

Update: 2019-06-04 12:37 GMT

महिलांनी आर्थिकरित्या सक्षम व्हावे यासाठी देशभरात अनेक उपक्रम राबविले जातात. तसेच अनेक महिलांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करत समाजातील महिलांना प्रेरणा देणारा संदेश दिला आहे. हाच संदेश समाजातील कानाकोपऱ्यात पोहचावा यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने महिला सक्षमीकरणावर आधारलेले लघुपट पाठविण्याचे आवाहन केलं आहे. या कार्यक्रमांमध्ये, उपक्रमांमध्ये निवडक लघुपट दाखविण्याचा हेतू आहे. यासाठी लघुपट निर्माते, दिग्दर्शक यांना महिला सक्षमीकरणाचे लघुपट पाठविण्याचे आवाहन आयोगाने केलं आहे.

( लघुपट vari.mscw@gmail.com या इ- मेलवर १५ जून २०१९ पर्यंत पाठविण्यात यावेत.)

Similar News