परळीची निवडणूक लक्षवेधी...

Update: 2019-08-09 07:03 GMT

काही महिन्यावर विधानसभा निवडणुका आहेत यामध्ये परळी मतदारसंघातून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे लढणार असल्याने राज्याचे लक्ष लागून आहे. मागील निवडणुकीत २५ हजारांच्या मताधिक्याने धनंजय यांचा पराभव झाला होता. या वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धनंजय यांनी यश मिळवल्याने त्यांच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरी लोकसभेत मात्र भाजपला २० हजारांचे मताधिक्य मिळाल्याने लढत पाहायला मिळणार आहे. मतांच्या विभाजनावर विजयी उमेदवाराचे मताधिक्य ठरणार असल्याने दोन्हीकडून मतविभाजनासाठी राजकीय डावपेच टाकले जात आहेत.

परळी,केज ,माजलगाव,गेवराई,आष्टी ,बीड या सहाही मतदारसंघांत भाजपची ताकद दिसून येते.

पक्षीय सत्ता

* परळी : भाजप

* केज : भाजप

* माजलगाव : भाजप

* गेवराई : भाजप

* आष्टी : भाजप

* बीड : राष्ट्रवादी

Similar News