महाविकास आघाडीचं किमान समान कार्यक्रम... मात्र महिलांसाठी काय ?

Update: 2019-11-28 12:21 GMT

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीचा शपथविधी थोड्याच वेळात शिवतीर्थावर पार पडणार आहे. तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम ठरलं असून पत्रकारपरिषदेद्वारे ही माहिती देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक उपस्थिती होते. यावेळी देशातीलराजकीय,बेरोजगारी,आरोग्य,उद्योग,शहरविकास,पर्यटन- कला व संस्कृती, सांस्कृतिक आणि धार्मिक विविधता, समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हा अजेंडा असणार आहे.

महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात महिलांसाठी काय ?

महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याचे समान किमान कार्यक्रमात जाहीर करण्यात आले आहे. आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करणार त्याचबरोबर महानगरे व जिल्हा मुख्यालयांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृहे (वर्किंग वुमन हॉटेल्स) उभारणार . अंगनवाडी सेविका/ आशा सेविका व आशा प्रवर्तक यांच्या मानधनात व सेवा सुविधेमध्ये वाढ करणार , महिला बचत गट सक्षमीकरणासाठी सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

Similar News