महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडलं. मतदानाची टक्केवारी पाहता राज्यात 60 टक्क्याच्या पुढे महाराष्ट्रात मतदान पार पडलं नाही. काही लोक मतदानाच्या दिवशी च्या सुट्टीला Enjoy करण्यासाठी वापरतात. मतदान हे आपलं कर्तव्य असल्याचं ते विसरतात. मात्र, स्वत:च्या पायावर उभं राहण्याची ताकद नसेलेल्या आजींना हे नक्की माहिती आहे की, त्यांच्या मतदानात देश उभं राहण्याची ताकद आहे.
स्वत : च्या पायावर उभं असणाऱ्या या देशातील अनेक तरुणांसाठी व्हील चेअरवर मतदानासाठी आलेल्या या आजी नक्कीच प्रेरणा दायी ठरतील...