‘धनुभाऊ तुम्ही चुकलात’- चित्रा वाघ

Update: 2019-10-20 09:55 GMT

विधानसभा निवडणूकीच्या रणधूमाळीचा तोफा आता थंडावल्या आहेत. परंतू प्रचाराच्या अंतीम टप्प्यात परळी मतदार संघातील धनंजय मुंडे यांचा प्रचारादरम्यान पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या व्हिडीओ विरोधात धनंजय मुंडे यांच्यावर भाजपने गुन्हा दाखल केला आहे.

धनंजय मुंडे यांची व्हिडओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी संबधित व्हिडीओ एडीट केला असल्याचं म्हटलं आहे. याविषयी त्यांच्या एकेकाळच्या सहकारी आणि सध्याच्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

“धनुभाऊ, आज तुमच्या बहिण पंकजा ताई सगळ्या महाराष्ट्राचं नेतृत्व करातायत. सक्षम नेतृत्व करतायत. पण आज निवडणूक काळात ज्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यावर वक्तव्य केलं. विशिष्ट प्रकारे हातवारे केले ते नक्कीच निषेधार्ह आहे,” असं चित्रा वाघ यांनी एका व्हिडीओद्वारे म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ.

Full View

Similar News