राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहटकर यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा
आज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. राज्य सरकार बदलल्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नवी नियुक्ती करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या निर्णयाच्या आदेशाविरोधात महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं.
“आयोगाच्या १९९३ च्या कायद्याने आयोगाच्या अध्यक्षांना दिलेले अधिकार आणि जबाबदारी पाहता, हे पद संवैधानिक आहे. या पदाला कायद्याने एका प्रकारे संरक्षण दिलेले आहे. कायद्यातील कलम (४) नुसार, पदाचा गैरवापर केल्याचे सिद्ध झाल्यासच आयोगाचे अध्यक्ष अथवा सदस्यांना पदावरून काढता येते. केवळ राज्य सरकार बदलल्याने आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून काढता येत नाही. संवैधानिक पद असल्याने महिला आयोगाचे अध्यक्षपदाला राज्य सरकारच्या विशेषाधिकार (Doctrine of Pleasure of Government) लागू होत नाही,”
काय म्हटलं होतं उच्च न्यायालयाने?
२०१३मधील एक जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने सरकार बदलल्याने रहाटकर यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि ५ फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने नव्या अध्यक्षांची नियुक्ती करावी, असा आदेश दिला होता. हा आदेश आयोगाच्या कायद्यातील स्पष्ट तरतूदींविरुद्ध असल्याचं सांगत रहाटकर यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
रहाटकर यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान?
2013 मधील एका जनहितार्थ याचिकेवरील सुनावणी करताना मा. मुंबई उच्च न्यायालयाने आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत राजकीय भाष्य केलं होतं. सरकार बदलले असताना आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा का दिला नाही, असे त्यामध्ये म्हटले होते. मात्र, आयोगाचे अध्यक्षपद अराजकीय स्वरूपाचे असल्याने आणि आयोगाच्या कायद्यातील कलम (4) अन्वये, या पदाला संरक्षण असल्याने पदावरून दूर करण्याबाबत राज्य सरकारला कायदेशीर प्रक्रियेचे अवलंब करावा लागेल,
हे ही वाचा
मारहाण झालेल्या त्या प्रेमी युगुलाने केले लग्न…
World Cancer Day 2020: जाणून घ्या ब्रेस्ट कॅंसरची लक्षण आणि त्यावरील उपाय…
असा दावा करत रहाटकर यांनी याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. त्यावर आज सुनावणी पार पडली.
सर्वोच्च न्यायालयात आज न्यायाधीश आर. बानूमती आणि न्यायाधीश ए.एस. बोपण्णा यांच्यासमोर सुनावणी झाली. विजया रहाटकर यांच्या याचिकेत उपस्थित केलेले कायदेशीर मुद्दे न्यायालयाच्या विचाराधीन राहतील, असा निकाल न्यायाधीश बानूमती व न्यायाधीश बोपण्णा यांनी दिला.
या निकालावर विजया राहटकर यांनी प्रतिक्रिया दिली.
"आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामध्ये अनावश्यक राजकीय शेरेबाजीविरोधात मी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज मा. सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत व पदावरून काढण्याबाबत आयोगाच्या कायद्यातील तरतूदींचा मुद्दा विचारार्थ ग्राह्य धरलेला आहे. हा माझ्या अराजकीय भूमिकेचा नैतिक विजय आहे. त्यामुळे आता हे पद स्वतःहून सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि तसे राजीनामा पत्र मा. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना आज सायंकाळी सादर केले आहे," अशी प्रतिक्रिया रहाटकर यांनी दिली.
कामाबाबत समाधानी
"आयोगामध्ये गेल्या साडेतीन वर्षांत खूप काम करता आले. विविध उपक्रम राबविले, महिलांना शक्य तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न करता आला, महिलांसाठी राज्य सरकारला विविध शिफारशी करता आल्या. या सर्व कामांचे समाधान आहे," असेही रहाटकर यांनी नमूद केले.