सुप्रिया सुळेंना सर्वाधिक मतदान

Update: 2019-05-24 08:16 GMT

२०१९ च्या निवडणुकीत मोदी सरकारने बहुमत मिळवत सत्ता मिळवली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर शिवसेनेला १८ तर भाजपला २३ ,काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४ ,वंचित बहुजन आघाडीला १ आणि अन्य १ अशी आकडेवारी आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभेत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

त्यांच्यासमोर भाजपच्या उमेदवार कांचन कुल समोर होते मात्र या लढतीत कांचन कुल यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित आणि अधिक मताधिक्य मिळवून देणारा हा मतदारसंघ आहे. याआधी २०१४ मध्ये सुमारे ६९ हजार मतांनी सुप्रिया सुळेंचा विजय मिळवला. यावेळी बारामती लोकसभेसाठी ६१.५४ टक्के मतदान झाले असून फक्त ७० टक्क्य़ांहून अधिक मतदान बारामतीत झाले आहे. यामध्ये सुप्रिया सुळेंना यांना ६ लाख ८३ हजार ७०५ मते मिळाली तर कुल यांना ५ लाख २८ हजार ७११ मते मिळाली.

Similar News