बुलढाण्यात लॉकडाऊन संपल्याच्या अफवांना जोर

Update: 2020-05-04 07:32 GMT

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 3 मे पर्यंत लॉकडाऊन होते. मात्र राज्य सरकारने हे लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा लॉकडाऊनचा कालावधी 17 मे पर्यंत राहणार असल्याचे स्पष्ट आदेश जिल्ह्याधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात ज्या अत्यावश्यक सेवा सुरु होत्या त्याच सुरु राहणार आहेत. त्यांच्या वेळा सुद्धा सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत राहणार आहे. तसेच सोशल मिडियावर लॉकडाऊन संपल्याचे खोटे व्हिडिओ वायरल केले जात आहे. ते चुकीचे असून अशा व्हिडीओ पसरवणाऱ्यांवर कड़क कारवाई करणार असल्याचेही जिल्ह्याधिकारी सुमन चंद्रा यांनी सांगितले आहे.

https://youtu.be/Y12VOAXfK7o

Similar News