'या' महिलेच्या पोस्टरमुळे फडणवीसांनी केली ठाकरेंवर टीका

Update: 2020-01-07 08:25 GMT

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात काल, रविवारी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे देशभर निदर्शने होत आहेत. ज्यावेळी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सर्वांत हिंसक आंदोलन झाले होते त्यावेळी देखील काही आंदोलक विद्यार्थिनी पुढे आल्या होत्या. या आंदोलनात काही जणांनी 'फ्री काश्मीर' असं लिहिलेले फलक हाती घेतले होते. यामध्ये काही जणांच्या हातात स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारे फलक होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एका तरुणीच्या हाती 'फ्री काश्मीर' असा उल्लेख असलेला फलक आहे. यावरती आता पुन्हा राज्याचं राजकारण तणावपूर्ण झालेलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टोला लगावला आहे. त्यांनी हा व्हिडिओ रिट्विट करून ठाकरे यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. 'आंदोलन नेमके कशासाठी आहे? या आंदोलनात 'फ्री काश्मीर'च्या घोषणा का? मुंबईत या अशा फुटीरतावाद्यांना कशासाठी सहन केलं जात आहे? असे अनेक सवाल करत फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

 

Similar News