जळीत कांडाचा दुसरा बळी; लासलगाव पीडितेचा मृत्यू

Update: 2020-02-22 07:18 GMT

नाशिकच्या लासलगाव जळीत कांडातील (Lasalgaon Lady Brunt) पीडितेची गेल्या सात दिवसांपासून मृत्यूशी चाललेली झुंज अपयशी ठरली आहे. आज पहाटे तिचा मृत्यू झाला असून मुंबईच्या मसिना हॉस्पीटल, भायखळा येथे तीच्यावर उपचार चालले होते. हिंगणघाट जळीत कांडातील पीडितेच्या मृत्यूनंतर आता लासलगाव घटनेतील पीडितेचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय. जळीत प्रकरणात मुख्य संशयित आरोपी रामेश्वर भागवत याच्यासह निलेश केंदळे आणि दत्तू जाधव या संशयितांना अटक करण्यात आलेली आहे.

नाशिकच्या लासलगावमध्ये बस स्थानकावर या महिलेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. चार ते पाच मुलांनी पेट्रोल टाकून या महिलेला जाळण्याचा प्रयत्न केल्याचं स्थानिकांचं म्हणणं होत. पीडित महीला ७० टक्के भाजली होती. या घटनेनंतर महिलेने आपल्या जवाबात आरोपीच्या बाजूने साक्ष दिली होती. दोघांच्या झटापटीत आपल्या अंगावर पेट्रोल सांडल्याने मी पेटले, त्याचा मला जाळण्याचा उद्देश नव्हता, असा दावा खुद्द पीडितेनेच केला होता.

Similar News