केजरीवाल सरकारमध्ये महिलांना दुय्यम स्थान का?  

Update: 2020-02-19 05:36 GMT

आप नेता अरविंद केजरीवाल (Arawind Kejariwal) यांनी रविवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सोमवारी त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. त्यांच्यासोबतच अन्य सहा मंत्र्यांनीही पदभार स्विकारला आहे. मंत्रीमडळाचं खातेवाटपही करण्यात आलंय. मात्र, या मत्रीमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात न आल्याने केजरीवाल सरकार टीकेचे धनी झाले आहे. महिला आणि बालविकास कल्याण खातही राजेंद्र पाल गौतम यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.

हे ही वाचा...

दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या (AAP) तिकीटावर ९ जागांवर महिला उमेदवारांनी लढत लढवली होती. तर आप, भाजप आणि कॉंग्रेसच्या एकुण २४ महिला उमेदवार उभ्या होत्या. त्यापैकी ९ जागांवर महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे ९ पैकी ८ जागांवर आपच्याच महिला उमेदवारांनी घवघवीत यश मिळवलं. तरीही दिल्ली मंत्रीमंडळात एकाही महिलेचा समावेश नसणं फारच आश्चर्यकारक मानलं जातय.

Similar News