जेव्हा उद्योजिका किरण शॉ ‘मोहल्ला क्लिनीक’ पाहुन प्रभावीत झाल्या...

Update: 2020-02-20 09:14 GMT

दिल्ली सरकारच्या मोहल्ला क्लिनिक (Mohalla Clinic) योजनेची भारतीय उद्योजिका किरण मजुमदार शॉ (Kiran Majumdar Shaw) यांनी प्रशंसा केल्यामुळे केजरीवाल सरकार पुन्हा चर्चेत आले आहे. विधानसभा निवडणूकीत भाजपकडून योजनेवर अनेक आक्षेप घेत ही योजना जनतेसाठी निरुपयोगी असल्याचं सांगण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, अपोक्षित यश भाजपच्या हाती लागलं नाही. आता खुद्द किरण शॉ यांनी प्रशंसा केल्यामुळे ‘आप’चा (AAP) आनंद द्वीगुणीत झालाय.

किरण मजुमदार यांनी दिल्लीतील दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arwind Kejariwal) आणि आप नेते राघव चड्डा यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी दिल्लीतील आरोग्य, शिक्षण, प्रदुषण, पाणी, संवर्धन, दळणवळण आणि रहदारी यासंबंधित सुधारणेविषयी आगामी योजनांवर चर्चा केली. या उपक्रमांचा दिल्लीला मोठा फायदा होईल असही त्यांनी यावेळी म्हटलंय.

मोहल्ला क्लिनीक योजनेविषयी बोलताना त्यांनी म्हटलंय की, साकेतमधील मोहल्ला क्लिनीकच्या भेटीदरम्यान तिथल्या रुग्णसेवा करण्याची पद्धती पाहुन खुपच प्रभावीत झाल्या आहेत. याबद्दल त्यांनी ‘आप’ला शुभेच्छा दिल्या आहेत.

Similar News