गर्भपिशवी काढलेल्या महिलांना सरकारचा दिलासा

Update: 2019-08-27 08:31 GMT

महाजनादेश यात्रेदरम्यान आज बीड येथे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी महिलांची गर्भपिशवी अवैधरित्या काढण्याचा मुद्दा आणि बीड सारख्या जिल्ह्यात महिलांना गर्भाशयं काढल्याची बातमी आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये सातत्याने येत आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर सरकार गर्भपिशवी काढलेल्या महिलांसोबत आहे,याकडे आम्ही पूर्ण लक्ष दिल आहे , विशेषतः महिला बाळ कल्याण विभागाने यासंदर्भात सर्वे करून यावरती उपाययोजना मोठ्या प्रमाणात सुचवलेल्या आहेत आणि या महिलांच्या पाठी सरकार पूर्णपणे उभा आहे असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

https://youtu.be/enmvsC7A-5I

 

 

 

 

 

 

Similar News