महिलांवर अश्लील कमेन्ट कराल तर सावधान ईशारा देतायत रुपाली ठोंबरे!

Update: 2020-01-09 13:19 GMT

मनसेच्या पुण्यातील नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे या आपल्या वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत असतात. मध्यंतरी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केल्यामुळे त्या चर्चेत होत्या. त्याचबरोबर ठाकरे मंत्रिमंडळातील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांवर त्यांनी केली टीका देखील चर्चेत होती. मात्र यावेळी अभिनेत्री दीपिका पदुकोणनं पहिल्यादांच जेएनयूतील हल्ल्याप्रकरणी निषेध नोंदवला असून तिला ट्रोलींगला सामोरे जावे लागले. तिचा आगामी चित्रपट "छपाक" प्रदर्शित होत आहे मात्र हा चित्रपट देखील या ट्रोलींगमध्ये अडकला आहे. माध्यमांवरती देखील अनेक डिबेट शो यावरती झाले. या प्रकरणावरती मनसेच्या पुण्यातील नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे यांनी थेट ईशारा दिला आहे. की एक महिला म्हणून महिलांना अश्या अश्लील कमेंटना सामोरे जावे लागते. मात्र आता यापुढे अश्या विकृत लोकांवर गुन्हे नोंद करणार आणि यावर पोलिसांनी दखल न घेतल्यास मनसे पद्धतीने चोप देऊ असा ईशाराच त्यांनी दिला आहे. महिला वर्गाला व्यक्त होण्याचा अधिकार मिळवून देण्याचं त्यांनी आपल्या फेसबूक पोस्ट वरून सांगितलं आहे.

"ती"व्यक्त होणारच.

आज अभिनेत्री दीपिका jnu मध्ये विद्यार्थाना भेटायला गेली तर एक विकृत आणि दहशतवादी पक्षातील लोक तिला ट्रोल करतात समाजामध्ये तिचे विचार व्यक्त करताना अनेक वेळा "ती' आहे म्हणून तिला अश्लील कॉमेंट टाकतात. त्यामुळे कित्येक महिला सार्वजनिक पणे व्यक्त होत नाही पण

या पुढे असे होणार नाही

मी adv. रूपाली पाटील-ठोंबरे अशा विकृत महिलांना वरती गुन्हे दाखल करणार आणि पोलिसांनी सहकार्य न केल्यास

आमच्या मनसे पद्धतीने चोप देऊन सर्व महिला वर्गाला व्यक्त होण्याचा अधिकार मिळवून देणारच.

- मनसे झाशीची राणी प्रतिष्ठान पुणे

Similar News