हैदराबाद पोलिसांनी जे केलं ते योग्य- तृप्ती देसाई

Update: 2019-12-06 10:19 GMT

हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संक्षयित आरोपींना पोलिसांनी ठार केले आहे. यावर समाजातील विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. हैदराबाद बलात्कार प्रकरणा विरुद्ध भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक होऊन त्यांनी महिला कार्यकर्त्यांसह तेलंगानाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या राहत्या घरासमोर विरोध निदर्शने केली होती. यानंतर तेलंगाना पोलिसांनी त्यांना अटक केली.सकाळीच आलेल्या या वृत्ताची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा आहे. याच प्रकरणावर तृप्ती देसाई यांनी मॅक्सवूमनला प्रतिक्रिया दिली.

"हैदराबाद पोलिसांनी जे केलं ते योग्य केलं त्यांच्या या निर्णयाचं मी अभिनंदन करते देशात अनेक बलात्कार प्रकरणातील केसी आहेत मात्र यावर अंमलबजावणी होताना दिसत नाही केंद्र सरकारला एक निवेदन आहे की या गुन्हेगारांना ६ महिन्याच्या आतच फाशीची शिक्षा व्हावी हा कायदा होणे गरजेचं आहे. असाच न्याय देशातील प्रत्येक पीडितेला मिळावं."

अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी दिली.

https://youtu.be/aHTfnH7hy_I

 

Similar News