महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने किती निधी दिला – निलम गोऱ्हे

Update: 2020-02-01 12:32 GMT

आज अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मांडलेल्या अर्थ संकल्पावर प्रतिक्रिया देताना विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. महिलांचं शिक्षणाचं प्रमाण वाढलं असल्याचं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं या वर भाष्य केलं.

महिलांचं हे प्रमाण अचानक वाढलं नाही. त्यासाठी मुली अगोदर प्राथमिक माध्यमिक असं शिक्षण घेऊन कॉलेज पर्यंत पोहोचल्या आहेत. यासाठी सर्वच सरकारने प्रयत्न केले आहेत. मात्र, सरकारने ‘निर्भया’ निधी साठी किती तरदूत केली. महिलांच्या सुरक्षीततेसाठी किती तरतूद केली हे पाहणं महत्वाचं आहे. नुसतंच बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणून चालणार नाही असं म्हणत महिलांच्या सुरक्षितेच्या प्रश्नावर सरकारने किती निधी दिला असा सवाल उपस्थित केला आहे.

बजेटमधून मुंबईकरांची घोर निराशा झाली आहे. मात्र, तिकडे गुजरातला गिफ्ट सिटी मिळत आहे. असं म्हणत निर्मला सितारमण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुळे गुजरातला झुकतं माप दिल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांबाबत गेले दोन वर्ष त्यांच्या भाषणात शेतकऱी या शब्दावर भर नव्हता. अलिकडे जशी निवडणूक जवळ आली तसा त्यांचा उल्लेख दिसून आला.

शेतकऱ्यांबात किसान रेल्वे सुरु होणार आहे. याचा किती फायदा शेतकऱ्यांना होणार? हे पाहणं महत्वाचं असल्याचं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. तसंच आजच्या अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी ची देखील घोषणा करण्यात आली. यावर बोलताना त्यांनी आत्तापर्यंत किती स्मार्ट सिटी निर्माण झाल्या असा सवाल उपस्थित केला आहे.

Similar News