हिंगणघाटच्या नराधमाचं 'हैदराबाद' सारखं काहीतरी करा: प्रणिती शिंदे

Update: 2020-02-06 14:07 GMT

हिंगणघाट येथे एका शिक्षिकेला भरचौकात जाळले. या घटनेमुळे महाराष्ट्रात या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. या विकृत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. अशी मागणी समाजातून केली जात आहे. या संदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी या आरोपीला हैदराबाद प्रमाणे शिक्षा करा. अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

'या घटनेचा मी निषेध करते. पीडित तरुणीची प्रकृती लवकर सुधारेल, अशी प्रार्थना मी करते. कायदे वगैरे असून सुद्धा या नराधम लोकांची मानसिकता कधी बदलेल, माहीत नाही. मुलींची छेडछाड करणाऱ्यांचा ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे. प्रशासन व घरच्यानी पीडितेला पाठिंबा दिला पाहिजे, दिलासा दिला पाहिजे.

तिच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे, कायद्याची भीतीच उरली नसल्याचं या घटनांमधून दिसतं. हिंगणघाटातील आरोपी जागेवरच पकडला गेला आहे. अशा परिस्थितीत कायदेशीर तपास, एफआयआर व अन्य बाबींची वाट पाहण्याची गरज नाही. गुन्हेगाराला तात्काळ कठोर शिक्षा देण्यासाठी पावलं उचलायला हवीत. या खटल्यांचा निकाल नव्वद दिवसांच्या आत लागला पाहिजे किंवा हैदराबादसारखं काहीतरी करा', अशी प्रतिक्रया दिली.

Full View

Similar News