कार्पोरेट टू पार्लमेंट तिचा प्रवास

Update: 2019-05-28 09:05 GMT

पं बंगालच्या कृष्णानगर या मतदार संघातून तृणमूल काँग्रेसच्या महुआ विजयी झाल्या आहेत. महुआ यांचा कृष्णानगरच्या मतदार संघात पोहचण्याचा प्रवास अमेरिकेच्या मैसाच्यूसेट्स इथून सुरू झाला. कॉर्पोरेट जगात वावरणाऱ्या महुआ थेट निवडणुकीच्या मैदानात उतरल्या. महुआने अर्थशास्त्र आणि गणित या विषयात शिक्षण घेतलंय. पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बैंकिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क आणि लंदनमध्ये काम करत त्या जेपी मॉर्गनमध्ये उपाध्यक्ष बनल्या. मात्र नशिबाला काही वेगळेच मान्य होते. त्यावेळी त्यांना राजकारणात प्रवेश करू अशी पुसटशी कल्पनाही नव्हती. हे क्षेत्र त्यानी स्वतः निवडलय. अमेरिकेत असताना वेगवेगळ्या ब्रँडचे कपडे घालणाऱ्या महुआ आता फुलिया कॉटनची साधी साडी घालतात. महुआ ज्या साधेपणाने न्यूयॉर्कमध्ये राहत होत्या. तश्याच त्या कृष्णानगरच्या मतदार संघात वावरतात. विशेष म्हणजे महुआला राजकारणात राहुल गांधी आणले. आणि त्या तृणमूल पक्षाकडून खासदार बनल्या आहेत.

Similar News