तीच बालपण बंधनात ?

Update: 2019-11-18 16:50 GMT

ही चौदा वर्षाची मुलगी एका लेकराला जन्म घालणार आहे ...ही कोण नाव गाव ही ओळख सांगता येत नाही पण ही 7महिन्याचं पोट घेऊन बाजारात पळत असते बाजार मागत हाताला मेहंदी दिवाळीत लावलेली आहे.डोहाळं जेवण करायला बाप म्हणतो पैसे नाहीत म्हणुन हिरव्या बांगड्यावर भागवलं आहे. या पोरीचं लग्न लावण्याचे अनेक कारणं आहेत जसे बाप दारूड्या ,ऊसतोड कामगार इत्यादी पण महत्वाचे कारण म्हणजे ही सारखी उड्या मारणं खेळणं घरात रगीलपणाने वागणं ऐतं खाणं बाजारत भजे चिवडा मागुन रस्त्यावरच खाणं अर्थात मनाला वाटन तिकडं हिंडणं यामुळे इटाळ येऊन वर्षपण होऊ दिलं नाही.

अन तिचं लग्न मुकाट्या कार्यकर्त्यांना चकमा देऊन केलं कारण इटाळ (मासिक पाळी)येऊन पोरी जास्त दिवस ठेवल्यास कोणी करत नाहीत.आम्ही असं इकडून तिकडं फिरणारे उचलकरी पोरगी कोणी उचलून नेली बलात्कार झाला तर बदनामी होईल मग ते सगळं आईचं म्हणनं. तर ही पोर शाळाबाह्य आहे ही शाळेत का येत नाही कुठे गायब झाली तिचा शासकीय लोक शोध घेताना दिसत नाहीत(कदाचित त्यांच्या अडचणी वेगळ्या असु शकतात)समाजात "बेटीबचावबेटीपढाव"योजना अशी राबताना दिसते लहान मुलींवर बलात्कार झाले तर किती कलमा किती मोर्चे आंदोलने होतात मग ईथे फक्त मंगळसूत्र घालून एका पुरूषाला रोज बलात्कार करायची तिच्याजवळ झोपायची परवानगी मायबाप देतात यासाठी आंदोलने करता येतील ?एक लेकरू होऊस्तर कोपटाच्या बाहेर या लेकराजवळ एक पुरुष (जो नवरा असतो )झोपतो याची चिड नाही येत आपल्याला?बालकामगारांचा प्रकल्प राबतात ते असे? गर्भातल्या पोरी वाचत आहेत पण वाचलेल्या पोरींचं काय? त्यांच्या शिक्षणाचं आयुष्याचं भविष्याचं काय? किती पोरींचे असे बालविवाह होणार आहेत ?पोक्सो कायदा,महिला बालकल्याण समित्या,हे अशा ठिकाणी कधी भेटतात?#भारतीयसंविधानानुसार कधी सन्मानाने निर्भयतेने भेदभावविरहीत जगता येईल यांना ही ?

(फक्त पोस्ट टाकुन जसे भागत नाही तसेच लाईक कमेंट शयर करून ही भागत नाही😢पण हे कुठं तरी थांबलं पाहीजे ?)

सत्यभामा

Similar News